केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणते मंत्रालय….!
कोण बनेगा करोडपतीच्या प्रश्नमंजुषीमध्ये अभिताभ बच्चन यांनी हॉटसीटवरील स्पर्धकाला विचारला प्रश्न...!!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )कर्तुत्वाला नेतृत्वाची साथ मिळाली तर नेतृत्व नावारूपाला येतं हा प्रत्यय आलाय “कोण बनेगा करोडपती या प्रश्नमंजुषा शो ” मध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा कारभार आहे हा प्रश्न विचारण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्रांने आयुष मंत्रालयात गेल्या 9 महिन्यात केलेल्या कामाची ही पावती असून बुलढाणेकरांसाठी ही गौरवाची बाब आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव केंद्रीयमंत्री पदासाठी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांनी पुढे केले 9 जुन 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच प्रतापराव जाधव यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार देण्यात आला गेल्या नऊ महिन्याच्या कार्यकर्तित आयुष मंत्रालयअंतर्गत विविध कार्यक्रम राबविले यामध्ये संविधानदिन 26 नोव्हेंबर ते 26 डिसेबर अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये देश का प्रकृती अभियान राबविण्यात आले . एक महिन्याच्या कालावधीत या अभियानांतर्गत एक कोटी 50 लाखाच्या जवळपास देशातील नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आलंय याशिवाय आयुर्वेद ,युनानी ,योगा आयुष विभागार्गत देशातर्गत भरीव काम केल्या जात आहे त्यामुळेच सोनीवरील लोकप्रिय ठरलेला प्रश्नमंजुषा शो अर्थात
कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात 17 फेबुवारीला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा पदभार आहे हा प्रश्न सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी विचारला होता .बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी गौरवाची गोष्ट आहे कर्तुत्वाला जेव्हा नेतृत्वाची साथ मिळते तेव्हा ते नेतृत्व फुलते आणि फुललेले नेतृत्व सर्वत्र बहारते हे या निमित्याने समोर आलायं …