जोपर्यंत बहिणीला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राखी बांधणार नाही भावाने घेतले प्रण….
धर्मवीर फाउंडेशन च्या वतीने 5 मार्च रोजी निघणार भव्य जन आक्रोश मोर्चा....

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जोपर्यंत बहिणीला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी राखी बांधणार नाही असा ठाम प्रण धर्मवीर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड या भावाने घेतले आहे.
10 फेब्रुवारी रोजी त्रिशरण चौक येथे स्नेहल नावाची युवती आपल्या आईसोबत स्कुटीवरून घराकडे जात असताना मालवाहक गाडीने तिला धडक दिली यामध्ये तिचा मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता अपघातामध्ये मालवाहक चालकाने अक्षर से गाडीची चाक तिच्या अंगावरून नेले यामध्ये तिचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुःखदायक होती. यामध्ये नागरिकांनी आरोपीला पोलिसाच्या ताब्यात दिले. मात्र त्याची काही वेळाने जमानात वर सुटका करण्यात आली होती.
त्यानंतर या घटने संदर्भात त्रिशरण चौक येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला होता स्नेहल भावपूर्ण श्रद्धांजली सर्व जनतेच्या वतीने वाहण्यात आली. पोलिसांनी त्यानंतर आरोपीला अटक केले मात्र हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. हिट अँड रन तसेच ड्रिंकिंग या गुन्ह्याप्रमाणे त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला कठोर ती कठोर शिक्षा देण्यात यावी ही मागणी यावेळी धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या घटने संदर्भात दि 5 मार्च रोजी बुलढाणा शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे. जोपर्यंत बहिणीला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी राखी बांधणार नाही ज्या दिवशी तिला न्याय मिळेल त्यादिवशी तिच्या आईच्या हाताने राखी बांधणार असे प्रण धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांनी घेतले आहे.
यावेळी आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ठोस पावले उचलू असा इशारा धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.