वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्याने उचलले टोकाचे पाऊल…

देऊळघाट:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील 24 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सागर गजानन कांबळे वय 24 रा. देऊळघाट असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे या तरुणांनी आज दि 21 फेब्रुवारी वार शुक्रवारी ३.३० वाजेच्या सुमारास बौद्ध वाडा तांदुळवाडी रोड देऊळघाट या ठिकाणी स्वतःच्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस घरी कोणी नव्हते. घरातील सर्व मंडळी हे बाहेर कामाला गेले होते. बहिण ही घरी आली असता तिला हा सर्व प्रकार दिसून आला. वडील हे मिस्तरी काम करता त्याला एक बहीण आहे.
त्याचा मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम साठी रेफर करण्यात आला.