केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद …!
रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग यांनी केली आयुष मंत्रालयाच्या पाच जागतिक विक्रमांची घोषणा…!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ): केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या “देश का प्रकृती परीक्षण” या अभियानात 1 कोटी 29 लाखांहुन अधिक नागरीकांचे प्रकृती परीक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असुन याशिवाय 5 जागतिक विक्रमांची नोंद झाल्याची अधिकृत घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग यांनी नुकतीच मुंबई येथे केली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना 5 ही विश्व विक्रमांची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहे.
ही भारतीय आयुर्वेदासाठी गौरवाची बाब आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघातुन सलग चौथ्यांदा निवडुण आलेले खासदार प्रतापराव जाधव यांचे नांव केंद्रीय मंत्रीपदासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांनी पुढे केले. 9 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळामध्ये प्रतापराव जाधव यांनी पहील्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये नव्यानेच निर्माण केलेल्या आयुष मंत्रालयाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली. गेल्या नऊ महीन्याच्या कालावधीमध्ये आयुष मंत्रालयाच्या वतीने विविध समाज उपयोगी कामे करण्यात येत आहे. शासकिय रुग्णालयामध्ये अमृत औषधालय यासह आयुर्वेद, युनानी, योगा संदर्भांत भरीव काम देशपातळीवर केल्या जात आहे.
गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान तथा भाजपाचे जेष्ठ नेते स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमीत्त संपुर्ण देशामध्ये देश का प्रकृती अभियान राबविण्यात आले. या एका महीन्याच्या कालावधीमध्ये देशातील 1 कोटी नागरीकांचे प्रकृती परीक्षण करण्याचे लक्ष निर्धारीत करण्यात आले होते. निर्धारीत लक्षाच्या पुढे जाऊन 1 कोटी 29 लाखापेक्षा जास्त नागरीकांचे प्रकृती परीक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आले. हा आयुष मंत्रालयाचा एक जागतिक विक्रम झाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे ॲडज्युडीकेटर रिचर्ड विल्यम्स स्टेनिंग यांनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात या नोंदीची अधिकृत घोषणा केली आहे. शिवाय 5 जागतिक विक्रमही या अभियानातंर्गत प्रस्थापीत झाल्याचे त्यांनी घोषीत करुन या पाचही विश्वविक्रमांची प्रमाणपत्रे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना प्रदान केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री राजेश कोटेचा, भारतीय चिकीत्सा पध्दती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, देशाचे प्रकृती परीक्षण अभियान समितीचे सचिव डॉ.आशुतोष गुप्ता, पद्मश्री-पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, वैद्य प्रा.राकेश शर्मा, डॉ.बी.एस.प्रसाद, डॉ.रघुराम भट्ट, डॉ.जगन्नाथ आणि श्री.सच्चिदानंद प्रसाद उपस्थित होते. देशका प्रकृती परीक्षण अभियान पुर्ण करण्यासाठी भारतातील 133758 विदयार्थ्यांनी, 16155 अध्यापकांनी, 31754 चिकीत्सकांनी, असे एकूण 181667 स्वयंसहायकांच्या योगदान मिळाले.