प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ – घरकुल स्वप्न साकार
आमदार चैनुसूख संचेती यांच्या हस्ते प्रमाण पत्र वाटप

मलकापुर :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे :- मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि मा. गृहमंत्री अमितभाई शहा व मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.
मलकापूर मतदारसंघातील नांदुरा येथे आमदार संचेती यांच्या हस्ते घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. ही घरे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नसून ती आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहेत. गरीब व गरजू कुटुंबांना स्थैर्य, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देणारी ही योजना त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवेल.
यावेळी गट विकास अधिकारी भरत हिवाळे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी चव्हाण साहेब, विस्तार अधिकारी नेमाडे साहेब, विस्ताराधिकारी प्रशांत जामोदे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी लोखंडे साहेब उपस्थित होते.