Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा तिसरा टप्पा स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या दिशेने एक सार्थक पाऊल

बुलडाणा जिल्हा परिक्षेत्रामध्ये तसेच मलकापुर तालुक्यातील पूर्णा नदी श्रीक्षेत्र धोपेश्वर या ठिकाणी या अभियानाचे आयोजन

Spread the love

मलकापूर आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:-संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतुने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना नदीच्या छठ घाट, आई.टी.ओ., दिल्ली येथे केला जात आहे. जल संरक्षण व स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण करणे हा या परियोजनेचा उद्देश आहे, जेणेकरुन भावी पिढ्यांना निर्मळ जल आणि स्वस्थ पर्यावरणाचे वरदान प्राप्त होऊ शकेल.

संत निरंकारी मिशनने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणूकींना आत्मसात करत वर्ष 2023 मध्ये संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ केला गेला. या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणे इतकाच नसून जल संरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनविण्याचा विचार विकसित करणे हा आहे. नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा अधिक व्यापक, प्रभावी व दूरगामी दृष्टीकोनातून वाढविण्यात आला आहे ज्यायोगे हे अभियान सातत्याने विस्तारीत होऊन समाजामध्ये जागरुकता, सेवा आणि समर्पणाची एक सशक्य लाट उत्पन्न करु शकेल.

 

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजाजी यांनी माहिती देताना सांगितले, की हे बृहत अभियान देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 1600हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येईल. या महाअभियानाची ही अभूतपूर्व व्यापकता त्याला एक ऐतिहासिक स्वरूप देईल ज्यातून जल संरक्षण व स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावशाली रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहचू शकेल. बुलडाणा जिल्हा परिक्षेत्रामध्ये मलकापुर तहसील पूर्णा नदी श्रीक्षेत्र धोपेश्वर या ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण भाग घेणार आहेत.

दिल्लीमध्ये हे अभियान पूर्वीप्रमाणेच ‘आओ सवारें, यमुना किनारे’ (चला सावरु यमुनेचे किनारे) या प्रेरक संदेशासह आयोजित केले जात आहे. संत निरंकारी मिशनचे सुमारे 10 लाख समर्पित स्वयंसेवक आणि त्याबरोबरच इंद्रप्रस्थ, जे.एन.यू. व दिल्ली विद्यापीठासह विविध संस्थांच्या युवकांसमवेत जल संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवला जाईल. गीतांची संगीतमय प्रस्तुति, समूहगायन, जागरूकता सेमिनार आणि सोशल मीडियाच्या माध्ण्यमातून जलजनित रोगांच्या व स्वच्छतेच्या प्रति जागृती पसरविण्यात येत आहे. हा पुढाकार केवळ स्वच्छतेपर्यंत सीमित न ठेवता आजच्या युवापिढीला समाजकल्याणाच्या दिशेने सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे एक सशक्त माध्यम बनेल.

 

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजदेखील बहुधा हीच प्रेरणा देतात, की आपण या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जावे. हे अभियान त्याच संकल्पाचे एक साकार स्वरूप आहे जे समाजाला जागरुकता, सेवा आणि समर्पणाच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचे कार्य करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page