शिवाजीराव तायडे यांना ‘अंभोडा भुषण’ पुरस्कार प्रदान…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- महाराष्ट्र मराठा सोयरीक या सामाजिक लोक चळवळीच्या वतीने समाजासाठी निस्वार्थपणे सेवाभावी दृष्टिकोनातून काम करणाऱ्या समाज बांधवाना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यावर्षी बोदवड येथे १९ फेब्रुवारी रोजी जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांना ‘अंभोडा भुषण’ व जेष्ठ साहित्यिका सौ. मालिनीताई सवडदकर यांना समाजरत्न पुरस्कार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवाजीराव तायडे हे सहकाराच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा संसाराचा गाडा हाकलायला हातभार लावीत असतात. स्वतच्या गावांसाठी सुद्धा त्यांची मोठी कामगिरी आहे. अंभोडा येथील स्मशानभूमीचा त्यांनी कायापालट केला आहे. स्मशानभूमीत त्यांनी मोठ्याप्रमाणात झाडांची लागवड व सुशोभीकरण केले आहे. कुठल्याही प्रकारचे समाजिक कार्य असल्यास त्याठिकाणी शिवाजीराव तायडे हे निस्वार्थपणे तन-मन-धनाने मदत करीत असतात. प्रत्येक मेळाव्यात येणाऱ्या लेकरांच्या पोटात दोन घास जावेत म्हणून भोजन व्यवस्थेसाठी दरवर्षी त्यांचा मोठा सहभाग असतो. बुलढाण्यात समाजभान जपणारं व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. नुकत्याच बुलढाणा येथे संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली त्याचे समाजाच्या वतीने कौतुकही झाले.
यावेळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मालिनीताई सवडदकर यांना समाजरत्न व शिवाजीराव तायडे यांना अंभोडा भूषण पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्यास सुनिल पाटील जवंजाळ, राजेंद्र ढोकणे, मधुकरराव बोरसे, कैलास चौधरी, डॉ. बाबुराव महाजन, संजय पाटील, विशाल तांगडे, निवृत्ती ढोले, शैलेश वराडे, आनंदराव देशमुख, दिनेश कदम, सुभाष चौधरी, नारायण राऊत, साहेबराव जवंजाळ, डॉ. आसाराम काजळे, किशोर शेळके, संजय जपते, माधवराव देशमुख, नाना पाटील, अनिल दांदडे, डॉ. सागर महाजन, सुरेखा सावळे, सुनीता जाधव यांनी सहकार्य केले.