दुबईतील अबुधाबी येथे 23 फ्रेबुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-हिदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरासह विदेशातही साजरी होत आहे आखाती देश अबुधाबी येथे 23 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव ही सहभागी होणार आहेत.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबूधाबी दुबई येथे शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांच निमंत्रण केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आला आहे या निमंत्रणाचा स्वीकार करून अबूधाबी येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव सहभागी होणार असून तेथील मराठी माणसांसोबत ही संवाद साधणार आहेत …