अंढेऱ्यात एलसीबीची धडाकेबाज कारवाई,१२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त….

देऊळगावराजा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे संतोष मधूकर सानप यांच्या शेतात मध्यभागी कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने अफूचे पीक घेतले होते जात होते. याबाबत बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर, २१ फेब्रुवारी रोजी एक पथक अंढेरा शिवारातील संतोष मधूकर सानप यांच्या शेतात गेले १४ गुंठे अफुची लागवड केलेली दिसली.सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात एका शेतामधून १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या लागवड केलेले अफूचे पीक जप्त केले आहे.या कारवाईत मध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष मधूकर सानप (वय वर्ष ४९, रा. अंढेरा) असे आहे.शेतात मध्यभागी कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने अफूचे पीक घेतले होते.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला यांची माहिती मिळाल्यानंतर, २१ फेब्रुवारी रोजी रात्री, एक पथक अंढेरा शिवारातील संतोष मधूकर सानप यांच्या शेतात गेले. थोडीफार अफूची झाडे लावली असतील असे पोलिसांना वाटले होते.
परंतु प्रत्यक्ष जेव्हा शेतात पाहिले असता, तब्बल १६ गुंठ्यामध्ये अफूची लागवड करून त्याचे संवर्धन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचेही डोळे विस्फारले.त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता, एक जनरेटर व अफूचे पीक मोजण्यासाठी एक काटा वापरून कारवाई करणाऱ्या पथकाने थेट शेतात प्रवेश केला. त्यानंतर तेथील अफूच्या पिकाची मोजणी करण्यात आली. त्यात १५ क्विंटल ७२ किलो, अर्थात १५७२ किलो वजनाची अफूची झाडे मिळाली. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ८ वाजेपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेची अंढेरा शिवारात कारवाई सुरू होतीजिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी यांच्या नेतृत्वात आणि देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं (एलसीबी) पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलीस निरीक्षक आशीष रोही, रूपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, प्रताप बाजड आदींनी ही कारवाई यशस्वी केली.