भालगाव येथील लोकुत्तर महाविहारचा भूमीपूजन सोहळा २२ फेब्रुवारीला आ.श्वताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते

चिखली,(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )- चिखली तालुक्यातील भालगाव येथील बुध्द रूपाचा प्रथम वर्धापन दिन साजरा होणार आहे. तसेच २२ , २३ फेब्रुवारीला धम्मपरिषद आयोजीत केली आहे. सकाळपासून धम्माचे विविध कार्यक्रम होणार आहे. या लोकुत्तरा बुध्द विहाराच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन २२ फेब्रुवारी शनिवारला संध्याकाळी चार वाजता चिखली मतदार संघाच्या लोकप्रिय, विकासमुर्ती लाडक्या आमदार श्वताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून या भूमीपूजन सोहळ्याचे मुख्यपाहूने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव मा. विद्याधरजी महाले पाटील राहणार आहे.
२२,२३ फेब्रुवार रोज शनिवार रविवार दोन दिवस सकाळपासून बुध्दध्माच्या विधी प्रमाणे कार्यक्रम महापरित्राणपाठ, भिक्खुसंघाची धम्मदेशना व दान कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या धम्मपरिषदेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अखीलभारतीय भिक्खुसंघाचे अनुसंघनायक बोध्दीपालो महाथेरो असून धम्मसेना अखील भारतीय भिक्खुसंघाचे महासचिव भदंत सुमनवन्नो महाथेरो चंद्रपूर यांची धम्मदेशना होणार आहे. तरी या धम्मपरिषदेला व विकास कामच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी श्रध्दावान उपासक, उपासिकानी या ऐतिहासीक कार्यक्रमास मोठ्यासंख्ख्येने तसेच श्रध्दायुक्त चित्ताने दान देवुन वेळ देऊन आपल्या कुशलकम्मचे संचय करून आपल्या पारमी वृध्दांगत कराव्यात असे आवाहन भिक्खु बी राहूला आणि भिक्खु संघाकडून करण्यात येत आहे.