शिवजयंती वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदंग वाजवत साजरी..

मलकापूर पांगरा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-येथील शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पांगरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर, सकाळी ८.३० वाजता मलकापूर पांगरा बस स्टॅण्ड येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. दुपारी २ वाजता महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ५ वाजता, शिवजन्मोत्सवाच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदाय टाळ-मृदूंग वाजवत, लेझीमच्या तालावर भजन गात होते. रथाचे आकर्षक प्रदर्शन आणि रोषणाई मिरवणुकीला आणखी उजाळा देत होते. विशेष म्हणजे, मिरवणूक डीजेमुक्त होती.
ज्यामुळे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरण अधिक भक्तिपूर्ण व आकर्षक बनले. शिवशंभो प्रतिष्ठान आणि शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.