राजर्षी शाहू मल्टीस्टेटने सामान्यांना पाठबळ दिले- डॉ. रतनसिंग राजपूत
खामगाव शाखा स्थलांतराचा उद्घाटन सोहळा उत्साहात : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांना पाठबळ देण्याचे काम राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून केले जात आहे. पारदर्शक व्यवहारातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने या पतसंस्थेची नक्कीच भरभराट होणार, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ.रतनसिंग राजपूत यांनी केले.
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या खामगाव शाखा स्थलांतराचा उद्घाटन सोहळा शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. स्थानिक सकळकळे कॉम्प्लेक्स, टॉवर चौकात हा कार्यक्रम झाला.
यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नानाभाऊ कोकरे, राष्ट्रवादी नेते देवेंद्र देशमुख, संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालती शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. संदीप शेळके यांनी संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास आणि यशाचा आलेख मांडला. एखादा व्यवसाय करायचा असल्यास प्रमुखाने पूर्णवेळ बसले पाहिजे. मात्र समाजकारण, राजकारण आणि व्यवसायात सक्रिय असल्याने संस्थेकरिता फारसा वेळ देऊ शकत नाही. परंतु संस्थाध्यक्षा मालती शेळके ही उणीव भरुन काढतात, असे ते म्हणाले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला समाजसेवक परवेज खान शहनाज खान, बु.जि.अध्यक्ष गवळी बिरादरीचे बुडून चौधरी नथ्थु चौधरी, विधीतज्ञ फौजदारी न्यायालय ॲड.भगवान जोहरी, समाजसेवक दिलीप पाटील, मराठा सोयरिक मंडळचे गजानन ढगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष शिवशंकर लगर, बंजरंग दलचे माजी संयोजक अमोल अंधारे, सामाजिक कार्यकर्ते रवी महाले, वंचित बहुजन आघाडी मा. अध्यक्ष शरद वसतकार, विधानसभा संघटक शिवसेना (उ.बा.ठा.) विजय बोदडे, सरपंच शेख शाकीर शेख चांद, बाजार समिती संचालक अशोक हटकर, विदर्भ युवा अध्यक्ष चर्मकार महासंघाचे विदर्भ युवाध्यक्ष प्रीतम माळवंदे, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मो. नियाज मो. मुस्ताक, माऊली अर्बन सोसायटीचे अध्यक्ष विनायक टिकार, इंगळे हॉस्पिटलचे डॉ. सदानंद इंगळे, विधी तज्ञ फौजदारी न्यायालय, ॲड.आशाताई भागवत, बाजारसमिती उपसभापती संघपाल जाधव, युवक काँग्रेसचे सचिव स्वप्नील ठाकरे, श्रीयोग अर्बनचे अध्यक्ष ॲड.अमोल डहाके, ओबीसी महासंघाचे डॉ.अनिल अमलकार, समाजसेवक विकास चव्हाण, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव अजय तायडे, तालुकाप्रमुख महिला आघाडी (उ.बा.ठा.) श्रुती पतंगे, युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे सुनिल सोगोडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.