बुलढाण्यात नीलम गोहेंच्या फोटोला मारले जोडे, निलम गोऱ्हेंनी उपकारांची परतफेड निचपणाने केली :- ॲड.जयश्री शेळके

बुलडाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. असे आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्याचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने शिवसेना नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
आदरणीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षासोबत गद्दारी करुन तीन वर्षांपुर्वी काही गद्दार पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी पन्नास खोके घेऊन पक्षासोबत पर्यायाने सबंध महाराष्ट्रासोबत गद्दारी करत लाचारी पत्करली. सर्व गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले त्याच वेळी मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. परंतु आजही महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दरारा कायम आहे. ठाकरे यांच्या नावाने आजही गद्दारांना घाम फुटतो. त्यामुळेच एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या अशी आक्षेपार्ह विधाने करुन शिवसेना पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचे काम निलम गोऱ्हे सारखे गद्दार करत आहेत. यावरुन स्पष्ट दिसतंय की, अजूनही गद्दारांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पुर्णच होत नाही.
१९९८ मध्ये निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी दिली. २००२ पासून आतापर्यंत ४ वेळा त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्याची संधी दिली. तसेच पक्षप्रमुख मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उपकरांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आजही त्या कार्यरत आहेत. ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी निलम गोऱ्हे यांना अनेक पदे दिली, मानसन्मान दिला, पक्षात आणि समाजात ओळख मिळवून दिली. त्या पक्षाप्रती आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करुन त्यांनी निचपणाचा कळस गाठला आहे. निलम गोऱ्हे यांनी पक्षप्रमुखांनी केलेल्या उपकारांची परतफेड त्यांच्या निचपणाने केली असे ॲड.जयश्री शेळके म्हणाल्या. अशा निचपणाचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिला आघाडीच्या वतीने शिवसेना नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाताई बढे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई खडसान, उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई बोधेकर, सहसंघटक आरतीताई देशमुख, शहर प्रमुख लताताई शिंदे, अर्चनाताई शेळके, भावनाताई पाटील, पुजाताई दाभाडे, रोहीणीताई राजपूत, वैशालीताई वाकोडे, गायत्रीताई गायकवाड, स्वातीताई नवले, शुभांगीताई बाहेकर, मिनाताई गव्हाणे, नंदाताई अंभोरे, रत्नाताई शेळके दिपालीताई जाधव, दिपालीताई राजपूत, स्मिताताई वराडे, सोनालीताई वाघ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.