Homeबुलढाणा (घाटावर)
वडाळी गावात आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली प्रत्यक्ष पाहणी…

मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- मतदारसंघातील वडाळी हे शेवटच्या टोकावरील गाव आहे. या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी गैरसोय होत आहे. अर्धा किलोमीटर रस्ता चढून महिलांना एक- दोन हांडे घेऊन जावे लागत आहे. फेब्रुवारी महिना पाहता पाणी दुर्भिक्ष ही मोठी समस्या असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी निर्देश दिले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे,मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, वरवंट चे उपसरपंच गजानन राठोड, उपस्थित होते.