Homeबुलढाणा (घाटावर)

केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे स्वीय सहाय्यक राजू भाऊ भोर ठरले खरे आरोग्यदूत…

Spread the love

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- हिराबाई चव्हाण रा.कुऱ्हा वय 49 यांना दि 17/02/25 रोजी प्यारालीस मुळे मेंदूतील 10 mm नस चॉकअप झाली. नस चॉकअप झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन करण्यासाठी सांगितले ऑपरेशनचा खर्च टोटल अडीच लाख रुपये त्यांना सांगण्यात आला पेशंटची परिस्थिती हलाकीची असल्याकारणाने ऑपरेशन साठी येणारा एवढा खर्च त्यांच्या बजेटच्या वरती होता त्यांनी विजय मालाणी यांच्यामार्फत आरोग्यदूत दिपक नाईक यांच्याशी संपर्क साधला असता अचानक आरोग्यदूत दिपक नाईक यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राजूभाऊ भोर हे सोबत होते दिपक भाऊंनी त्यांना हिराबाई चव्हाण या पेशंट विषयी पूर्ण सविस्तर माहिती दिली राजू भाऊंनी लगेच संभाजीनगर येथे दोन तीन हॉस्पिटल ला फोनवरती कॉन्टॅक्ट केला असता हा पेशंट कोणत्याही योजनेमध्ये बसणार नाही असे सांगण्यात आले तरीपण राजू भाऊ यांनी हार मानली नाही त्यांनी त्यांच्या लेव्हल वरती खूप काही प्रयत्न करून शेवटी एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ओळखीमुळे की तुम्ही पहिले यां पेशंट च ऑपरेशन इमर्जन्सी मध्ये करा जीव वाचल्यावरती आपण बघू यांचं पेमेंट च काय करायचं ते तेवढ्यात भाऊंना थोडा वेळ राजूभाऊंना भेटला आणि पेशंटचा ऑपरेशन emergency रात्री 12.30 वाजता करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री राजूभाऊ भोर यांनी त्यांचा लेव्हल वरती या पेशंटला येणारा अडीच लाख रुपये येवढा टोटल खर्च पूर्णपणे मोफत करून दिला.

भविष्यात महाराष्ट्रातील कोणालाही वैद्यकीय सेवेसाठी गरज भासल्यास खालील पत्त्यावर संपर्क करावा.

राजू भाऊ भोर मो

. नं. 011-23740412

011-23740413

Adress :-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय, महाराष्ट्र बँकेचा बाजूला जिजामाता क्रीडा संकुल, बुलढाणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page