98अ. भा. म. साहित्य संमेलन दिल्ली मद्ये कु. नम्रता रिंढे यांचे सातपुड्यातील आदिवासी लोक जीवन पुस्तकं प्रकाशित…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे 98 वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे तालकटोरिया स्टेडियम येथे नुकतेच पार पडले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणुन लाभलेले माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, स्वागत अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार साहेब, संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवळकर मॅडम, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते. तांदुळवाडी गावातील युवा लेखिका कुमारी नम्रता रिंढे यांचे पुस्तकं माननीय विधान परिषदेच्या उपसभापती तसेच साहित्यिक डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांचा हस्ते “सातपुड्यातील आदिवासी लोक जीवन”या पुस्तकाचे प्रकाशन झाले. युवा लेखिका कुमारी नम्रता रिंढे यांचे “मुलगी म्हणून जगताना “या पुस्तकांचे प्रकाशन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,अमळनेर येथे संमेलनाध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे यांचा हस्ते करण्यात आले होते. त्या पुस्तकास गोव्यातील सन्मान नारीशक्ती पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच राज्यस्तरीय आदर्श साहित्य रत्न पुरस्कार सुध्दा प्राप्त आहेत. कुमारी नम्रता रिंढे या लेखिकेने या पुस्तकात सातपुड्यातील आदिवासी जीवनशैली अधोरेखित केली आहे. तांदुळवाडी सारख्या ग्रामीण भागातून सकस साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असल्याचा सूरही यावेळी उमटला. नम्रताला आजोबा दलितमित्र श्री.भुजंगराव रिंढे पाटील, आजी सौ. चंद्रकला रिंढे,वडील श्री.आबाराव रिंढे , आई सौ. संगिता रिंढे, काका श्री. राजेश रिंढे पोलिस पाटील, काकू सौ. वंदना रिंढे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.