मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना जाणवला चटका…
मार्च च्या पहिल्याच दिवशी ४० डिग्रीपर्यंत तापमान..

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे :- गेल्या किती दिवसांपासून एक तारीख म्हटलं की नागरिकांना काहीतरी विशेष जाणवते ते म्हणजे कधी नागरिकांच्या फायद्यासाठी असते किंवा नागरिकांच्या खिशाला कात्री लागते. परंतु फेब्रुवारी महिना सरताच चाहूल लागते ते कोवळ्या उन्हाची आणि आज आजची सुद्धा तारीख एक आज सरकारने सुद्धा नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आणि निसर्गाने सुद्धा नागरिकांना चटका दिला यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना किती चटके सहन करावे लागतात याचे चर्चा सध्या चावडी वर सुरू आहे. पूर्वीच्या लोकांची अशी कल्पना होती की, जोपर्यंत रोडगा तापत नाही तोपर्यंत उन्हाचा चटका जाणवत नाही परंतु वातावरणातील बदल आणि नागरिकांकडून नैसर्गिक साधन संपत्तीचा होत चाललेला ऱ्हास यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर खूप मोठा परिणाम होत आहे त्यामुळेच निसर्गात एवढा बदल झाला आहे . आज संपूर्ण विदर्भामध्ये उन्हाचा चटका जाणवला व मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी 40 डिग्री पर्यंत तापमानाचा पारा चढला त्यामुळे नऊजात बालक, गरोदर महिला व वृद्ध लोकांना याचा त्रास जाणवला म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांनी आपापली काळजी करावी हीच आशा व्यक्त होत आहे.