एकाच रात्री तीन ते चार घरांची घोरपडी, ग्रामीण भागामध्ये चोरांची टोळी सक्रिय…
घिर्णी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, रात्रभर बरेच नागरिक जागीच

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे :- घिर्णी अनेक दिवसापासून शहरांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत आणि नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे आता चोरांनी आपले पाय गावाकडे वडवल्याचे दिसत आहे मलकापूर तालुक्यातील पंचक्रोशी मध्ये प्रति शेगाव म्हणून ओळख असलेल्या घिर्णी गावामध्ये रविवारच्या रात्री सुमारे ( १:३० ते २:३०) सुमारास चोरीच्या तीन ते चार घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार चोरांनी घडवून आणला टप्प्याटप्प्याने चोरी करत चोरांच्या टोळीने नागरिकांच् मुद्देमाल, सोन, मौल्यवान वस्तू कपडे तसेच महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेली फाईल हे सुद्धा चोरांनी चोरून नेली या सर्व ठिकाणाहून चोरांनी जवळपास एक लाख पंचवीस हजार चा मुद्देमाल नेल्याची घटना समोर येत आहे तसेच अनेक महागड्या वस्तूंवर हात सपा करून चोर अंधाराचा फायदा घेऊन शेतीचा रस्त्याने पळ काढला यामध्ये एका घराच्या चोरी करत असताना घरामध्ये झोपलेल्या कुटुंबाला कोणीतरी आल्याचा संशय झाला आणि ते सतर्क झाले बघक्ताबघता चोरांनी त्याच घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि तो तोडला पण तेवढ्यात सर्व कुटुंब जागे होऊन आरडाओरडा करू लागले चोरांनी अंधाराचा फायदा घेत शेतीच्या रस्त्याने पाळ काढला कुटुंबाच्या सतर्कतेमुळे होणारे नुकसान टळले. परंतु इतर तीन ठिकाणी चोरांनी घरातील मूल्यवान कपाट फोडून त्यामधील पैसे व डाग दागिनेचे चोरी करून त्या ठिकाणाहून दुसरीकडे पळ काढला यामुळे संपूर्ण गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांमध्ये अनेक चर्चांना उद आला आहे गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील माल आपल्या घरी अंगणामध्ये पडलेला आहे , शेतीसाठी लागणारे अवजारे आपल्या घराच्या आजूबाजूला पडलेले आहेत. टू व्हीलर, ट्रॅक्टर बैल जोड्या या सर्वांच्या सुरक्षेतेचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा निर्माण झाला आहे . गाव पातळीवर सुरक्षेतेचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतो मात्र याकडे कुणी आवर्जून लक्ष देत नाही त्यामुळे अशा घटना दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे .चोरीचा घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी कुठलाही विलंब न करता घटनास्थळी येऊन पंचनामा करून अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .