महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी एकवटले बौद्ध बांधव…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-महाबोधी विहार 1949 कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता महाबोधी महाविहार बोधगया येथे अनिश्चित कालीन आमरण उपोषणास बौद्ध भिक्षू बसले आहेत.त्यांच्या समर्थनात सोमवार दि.3 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुलढाणा येथे एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बुलढाणा येथील समस्त बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्यावतीने महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.महाबोधी महाविहार बोधगया येथे राजकुमार सिद्धार्थला बोधी वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झाले. त्यामुळे हे स्थळ जागतिक बौद्धाचे पवित्र श्रद्धास्थान आहे. या विहाराची निर्मिती 2600 वर्षा पूर्वी सम्राट अशोक यांनी केली होती.जागतिक वारसा धरोहर म्हणून या महाविहाराची नोंद झालेली आहे.
1949 मध्ये महाबोधी महाविहार ॲक्ट बनवण्यात आला. या कायद्यानुसार आजही हे विहार महंतांच्या ताब्यामध्ये आहे. या विहारावरती अधिकार हा बौद्ध धर्मीयांचा असला पाहिजे परंतु या कायद्यांतर्गत वर्तमानात सुद्धा या विहारावर इतरांचा ताबा आहे. त्यामुळे या विहाराचे विद्रूपीकरण आणि विहार परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
भारत देशात भारतीय संविधान लागू झाल्यानंतर 1950 पूर्वीचे सर्व कायदे रद्द होतात. राज्यघटनेत धर्म स्वतंत्र्याचा मूलभूत अधिकार कलम 25 ते 28 मध्ये दिला आहे. या अधिकारांतर्गत ज्या धर्माचे अनुकरण करणारे अनुयायी असतील त्याच धर्मातील लोकाना त्या पवित्र स्थळाचा अधिकार दिलेला आहे. 1949 चा कायदा हा भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराची उल्लंघन करते म्हणून हा कायदा बदलून महाबोधी महाविहार कायदा नवीन बनवून महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा हा बौद्ध बांधवांना देण्यात यावा याकरिता या एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आंदोलनाचे मुख्य आयोजन कुणाल पैठणकर,रमेश घेवंदे एड.राहुल दाभाडे, आत्माराम चौथमोल,गणेश झोटे, पद्माकर डोंगरे, शाहीर इंगळे, बी.के.इंगळे, अमोल खरे, निलेश गायकवाड, श्रीधर जाधव, अनंता मिसाळ, प्रमोद दाभाडे, लताताई खिल्लारे, सुजाताताई हिवाळे, नीता दाभाडे, वर्षा कासारे, ज्योती आराख, लता पैठणकर, अस्मिता खंडेराव, वंदना इंगळे, सुनंदा झोटे, रूपालीताई भालेराव, नीरज ताई, भांबळे ताई, रेखा कांबळे बौद्ध उपासक व उपासिका या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.