जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत २० लाखांचा गुटखा पकडला…

जळगाव जामोद :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-जळगाव जामोद तालुका हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेला तालुका आहे. मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा, अग्नि शस्त्रांची मोठी वाहतूक जळगाव जामोद तालुक्यामधुन होत आहे, या अवैध धंद्यांना सहकार्य जळगाव जामोद वन विभागाचे अधिकारी करीत असल्याचे नेहमीच नागरिकांच्या चर्चेत असते यामुळेच जळगाव जामोद तालुका हा अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून याकडे जळगाव पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे. दिनांक २ मार्च रोजी मध्यप्रदेश वरून जळगाव जामोद मार्गे नांदुरा कडे जाणाऱ्या मालवाहू बोलेरो पिक अप वाहन भरधाव वेगाने जात होते. यावेळी या वाहनाचा धक्का रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाला लागल्याने तो जमिनीवर पडला यामुळे नागरिकांनी भरधाव वेगात असलेली बोलेरो पिकअप गाडी मानेगाव जवळ अडविली यामुळे त्या गाडीच्या चालकाची तारांबळ उडाली यामुळे तिथे उपस्थित नागरिकांना शंका आल्याने त्यांनी गाडीमध्ये पाहिले तेथे उपस्थित नागरिकांना गाडीमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे कॉल केला यावेळी डायरी अंमलदार ग्यानसिंग राठोड यांनी घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिल्याने लगेचच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी व गुटख्यासह गाडी पोलीस स्टेशनला आणून लावली. यामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा महाराष्ट्र मध्ये प्रतिबंध असलेला गुटखा विमल, पानबहार, विमल तंबाखू आढळल्याने पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मालवाहू बोलेरो पिक अप क्रमांक एमएच ४८ एवाय ३४२१ सह प्रतिबंधित गुटखा किंमत अंदाजे २० लाख ४४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी सोडून बोलेरो वाहनाचे चालक यास आरोपी केले. चोर सोडून संन्याशाला फाशी असा येथील पोलीस स्टेशनचा कारभार असल्याचे नागरिक बोलत आहेत. तसेच मध्य प्रदेश होऊन येणार हा अवैध गुटखा खामगाव येथील मोठ्या व्यापाऱ्याचा असल्याचे कळते. याचा संबंध जळगाव जामोद पोलीस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्यांशी सुद्धा असल्याचे नागरिकांच्या चर्चांमधून कळते. सदरची कारवाई करतेवेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, अमोल पंडित, नागेश खाडे, हवालदार पुंडे, उमेश शेगोकार,शिपाई सचिन राजपूत उपस्थित होते. आरोपी मालवाहू बोलेरो पिकअप चालक याच्यावर मानवी आरोग्यासाठी अपायकारक व महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला गुटखा वाहतूक प्रकरणी अन्नसुरक्षा मानके नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहेत.