अवघ्या पाच वर्षाचा मुदब्बीर शेख नईम बालकाचा पहिला रोजा!

चांडोळ ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):- लहान मुले हट्टी असतात. त्यांच्या हट्टासमोर कुणाचेही काहीही चालत नाही. असाच एक प्रकार चांडोळ येथे पाहायला मिळालाय. याठिकाणी एका पाच वर्षे पाच वर्षाच्या मुलाने तब्बल 14 तासांचा पहिला उपवास (रोजा) ठेवला. विशेष म्हणजे यामागाचे कारणही तितकेच अनोखे आहे. ‘अल्लाह पे भरोसा है!’ असा तो म्हणतोय.. इच्छापूर्तीसाठी त्याची ही तपश्चर्या असावी, असे वाटते!
चांडोळ येथील मुदब्बीर शेख नईमचा हा पहिला रोजा आहे. हा रोजा अत्यंत कठीण असतो.मुस्लिम बांधवाच्या रमजान महिन्याचा प्रवास रविवार पासून सूरु झाला आहे. इस्लाम धर्मात रमजानला जास्त महत्व दिले जाते. यावर्षीही भर उन्हाळ्यात उपवास (रोजा ) ला सुरुवात झाली आहे.चांडोळ येथील ग्रामपंचायत सदस्य सय्यद कलीम अत्तार यांचा 5 वर्षाचा भाचा शेख मुदब्बीर शेख नईम याने आपल्या जीवनातील पहिला रोजा केला आहे.ही बाब कौतुकास्पद समजली जात आहे.