केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश….
जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना संघटन मजबुत करून कामाला लागण्याचे केले आवाहन

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा अस आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले
बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ येथे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याच आयोजन करण्यात आल होतं यावेळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा टाकुन त्यांचा अधिकृत शिवसेनेत पक्षांमध्ये प्रवेश करून घेतला यामध्ये सेवादल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन लांडे पाटील माजीसंरपच सौ.ज्योतीताई लांडे पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी पक्ष प्रवेश केला . यापक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष .देवीदास जाधव,माजी पंचायत समिती सदस्य राजु पवार,चिखली शिवसेना ता.प्रमुख गजानन मोरे,महिला आघाडी जि.प्रमुख सौ.माया म्हस्के,शिवसेनेचे श्री.पृथ्वीराज गायकवाड,श्री.संजय गांवडे,युवासेनेचे पदाधिकारी श्री.अमोल शिंदे,श्री.मयुर पडोळ,श्री.संदीप पालकर व शिवसेना, युवासेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की शिवसेनेने कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका केली आहे शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमदार खासदार मंत्री बनलाय अनेक नेते घडविण्याचे काम हे शिवसेना संघटनेने केले आहे शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना होती तेव्हापासून आपणही शिवसेनेमध्ये काम करत आहोत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे सूत्र घेऊन शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये काम करत आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काही स्वार्थी नेत्यांनी पदाच्या खुच्चीसाठी भाजपासोबत गद्दारी करून दुसऱ्या पक्षासोबत सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न केला होता . परंतु शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांनी उठाव करून मित्र पक्ष असलेल्या भाजपासोबत पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून शिवसेनेला हिंदुत्ववादी विचार सोबत ठेवणाच काम केलं आहे ..गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला जनतेने भरभरून मतदान केले आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले केंद्राने राज्य सरकारच्या लोक उपयोगी कामांची योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं.