समाज कल्याण येथील सामाजिक सभागृहामध्ये जागतिक महिला दिन साजरा…
जिल्हा परिषद सिओ गुलाबराव खरात मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन....

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – आज जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.अनेक सामाजिक संस्था महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. यामध्ये जनजागृतीपर व्याख्याने, कार्यशाळा आणि रॅलींचा समावेश आहे.
बुलढाणा येथील सामाजिक न्याय भवन येथे मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजेपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिओ गुलाबराव खरात व मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी व माँ फातिमा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शीलाताई किरण पाटील, योगिताताई इंगळे, एडवोकेट शर्वरीताई तुपकर, अनुजा ताई सावळे, मृणाल ताई सपकाळ, निशाताई जेल यांची उपस्थिती होती. समाज कल्याण अधिकारी अनिताताई राठोड तसेच जिल्हा परिषद सी ओ गुलाबराव खरात यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम समूह नृत्य एकल नृत्य समूह गीत एकल गीत कविता गायन अंताक्षरी व प्रश्न उत्तरांचा खेळ असे विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या आहे.
या कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका पुष्पा ताई गायकवाड, अंजली ताई नेटके, जेमला ताई राठोड, वैशालीताई उबरांडे, राधाताई उबरांडे, उज्वला ताई जुपे, अरुणाताई पांचाळ, पोर्णिमा ताई रोठे, राधाताई गोसावी यांनी बजावली आहे.