Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
जिल्हा परिषद जवळ असलेल्या झेडपी स्कूलच्या रूमला लागली भीषण आग…

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- नुकताच उन्हाळ्या ऋतूची चाहूल लागत आहे आणि यामध्येच गरम वातावरण हे जिल्हा परिषद जवळ असलेल्या झेडपी स्कूलमध्ये दिसून आले. आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक झेडपी स्कूल मध्ये असलेल्या एका जुन्या खोलीला भीषण आग लागली आहे. काही वेळातच त्या ठिकाणी अग्नीचा प्रचंड तांडव दिसून आला मोठ्या प्रमाणात ही आग वाढत गेली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल त्या ठिकाणी पोहोचले आणि आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आग विझवण्यात त्यांना यश आले.
नेमकं ही आग कशामुळे लागली आहे याचे अद्याप कारण कळू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र आगीमुळे रूमचे नुकसान झाले आहे.