क्षुल्लक कारणावरून ग्राम कुंड मध्ये तिघा मायलेकांना काका पुतण्याची मारहाण
जखमी मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

मलकापुर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रवींद्र गव्हाळे:- शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कुंड बु! येथे दि. 7 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान शुल्क कारणावरून गावातील काका पुतण्यांनी तिघा मायलेकांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत वैभव राजु तितरे वय 23 रा. कुंड बु! याने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून फिर्यादीत नमूद केले आहे की दि. 7 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन वाजे दरम्यान गावातील लग्न समारंभामध्ये जेवण करीत असताना विष्णू नारायण कवळे याने येऊन माझ्याशी वाद घातला मात्र लग्न दुसऱ्याच्या घरचे असल्याने मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो माझ्यासोबत वाद घालतच होता तेव्हा तिथे माझी आई नामे आशा राजु तितरे यांनी सर्व पाहिले म्हणून माझी आई विष्णू कवळे यांच्या घरासमोर जाऊन त्याचा भाऊ हरी नारायण कवळे यास सदर भांडणाबाबत सांगत असताना तेथे विष्णू नारायण कवळे,किरण गोपाल कवळे, आदित्य गोपाल कवळे, हरी नारायण कवळे असे चार काका पुतणे आले व त्यांनी माझ्यासोबत वाद घालून आईला लोटपोट केली असे समजल्याने मी माझा भाऊ गौरव तितरे असे तेथे गेलो असता विष्णू नारायण कवळे, किरण गोपाल कवळे, यांनी माझ्यासोबत वाद घालून मला शिवगाळ केली माझा भाऊ गौरव हा भांडण सोडण्यासाठी आला असता त्याला किरण कवळे, आदित्य कवळे यांनी खाली पडलेली वीट उचलून त्याला डोक्यात मारली उजव्या हातावर काठीने मारहाण करून जखमी केले मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता हरी कवळे, विष्णू कवळे यांनी लाकडी काठीने डाव्या हाताचे पंजावर पाठीवर व उजव्या पायाच्या पंजावर मारहाण करून मला जखमी केले, भांडणाच्या झटापटीमध्ये माझ्या गळ्यातील चांदीचा गोफ पडून गहाळ झाला त्यानंतर मी व माझी आई, भाऊ उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचार करण्यासाठी गेलो तेथे डॉ.नी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविले,या प्रकरणी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून विष्णू नारायण कवळे,हरिनारायण कवळे, किरण गोपाल कवळे, आदित्य गोपाल कवळे या काका पुतण्यांवर कलम 118 (1), 115 (2),352,3(5) बिएनएस गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.