घिर्णी गावातील नागरिकांच्या सतर्कमुळे चोरीचा प्रयत्न फसला…
गावातील तरुणांनी घेतला सुरक्षतेचा प्रश्न हाती, रात्रभर जागून केली गावाची रक्षा

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे- गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे रोज कुठे ना कुठे चोरीची घटना पाहायला मिळते त्यामुळेच नागरिकांच्या सुरक्षेतनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे रविवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास चोरांनी घिर्णी गावामध्ये धाडसी चोरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता त्यामध्ये चोरांनी जवळपास एक लाख 25 हजार चा मुद्देमाल लंपास करून नागरिकांच्या मालमत्तेला नुकसान पोचले होते त्यामुळेच गावातील नव तरुणांनी आपल्या घराची सुरक्षिता आपणच करावी आपल्या गावाचे सुरक्षितता आपणच करावी अशी धारणा मनी धरून गावातील तरुणांनी एक व्हाट्सअप ग्रुप बनवून सर्व तरुणांना एकाच वेळेस मेसेज जाईल व सर्व मित्रमंडळी सावध होतील आणि आपल्या परिसराची व वगावाची सुरक्षा आपणच करावी या उद्देशाने ही संकल्पना गावातील नवतरुणांनी नवयुवकांनी अंगीकारल्यामुळे सर्व स्तराकडून गावातील तरुणांचे कौतुक केल्या जात आहे.
परंतु चोरांच्या टोळीमुळे मलकापूर, शेगाव ,मोताळा, मेहकर, चिखली, व संपूर्ण बुलढाणा जिल्हा सध्या चोरीच्या घटनांचा केंद्रबिंदू झाला आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे रोजच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत होऊन हतबल झालेले आहे.