Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

‘उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणाच्या वतीने “विभागीय, जिल्हा व मिनी सरस” चे आयोजन दि. 28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 दरम्यन जिजामाता प्रेक्षगार क्रीडा व व्यापारी संकुल बुलढाणा येथे करण्यात आले होते. या महोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटातील उत्पादित साहित्याची विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

 

राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी झाला. उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी “अप्सरा आली” फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आगमनाणे उमेदच्या सरस प्रदर्शिनीस प्रेक्षकांची गर्दी उफाळली होती. तसेच त्यांनी आपल्या साध्या व सरळ स्वभावातून बचत गटातील महिलानी बनविलेल्या वस्तु व खाद्य पदार्थाचे काय महत्व आहे, तसेच त्यांचे उत्पादन घेण्यास समस्त जनतेस आवाहन केले होते. यावेळी “उमेद मार्ट” या ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबतची माहिती दिली. तसेच प्रेक्षकांच्या आग्रहावर त्यांच्या जोडीला बोलविलेल्या बुलढाण्यातिल प्रसिद्ध ए. जे. डान्स क्लासच्या नृत्य कलाकारांसोबत “अप्सरा आली’ गाण्यावर ठेका धरला. आपल्या मोहक अंदाजाने उपस्थित रसिकांना भारावून टाकले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दि. 1 मार्चला बापू चव्हाण प्रस्तुत “गजर महाराष्ट्राचा” ह्या महाराष्ट्रातील सर्व लोककलेचा संगमातून तसेच आपल्या कलेतून समस्त रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी दि. 2 मार्च रोजी स्वप्नील आराख प्रस्तुत ‘स्वर मिलाप टीम’ च्या धमाकेदार हिन्दी व मराठी गाण्याची मेजवानी प्रस्तुत करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. दि. 3 मार्च रोजी “महाराष्ट्राचा शाहीरीबाणा” म्हणून नावाजलेले युवाशाहीर विक्रांतसिंग राजपुत व त्यांच्या टीमने पोवाडा व स्फूर्तीगीतांचा कार्यक्रमाने मराठी माणसांच्या अंगाला शहारे येतील अशा निनादाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण आयुष्याची महती व संघर्ष आपल्या पोवाड्यातून व्यक्त केला. त्यानंतर कार्यक्रमाला चार चांद लागले ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आपल्या अंतरी दडलेल्या कलेचा नमूना तबला व ढोलकी वाद्य वाजवून उपस्थितगनाचे लक्ष्य वेधून घेतले.

 

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि. 4 मार्च रोजी दुपारी मराठी अभिनेता तसेच आगामी मराठी चित्रपट ‘सुनबाई लय भारी’ चे रोहण पाटील यांनी सर्व स्टॉल धारक यांच्याशी हितगुज केली. समरोपा अगोदर उत्कृष्ट 3 स्टॉलला पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन स्टॉल धारक महिलेचा सन्मान करण्यात आले. यामध्ये जळगाव जामोद, सूनगाव येथील भिमाई समूहाच्या सफेद मुसळी पावडर या उत्पादनाला प्रथम क्रमांक व 11 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले, शेगांव तालुक्यातील माता रमाई यांच्या खानावळी स्टॉलला द्वितीय क्रमांक व 7 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. मलकापुर तालुक्यातील हिरकणी समूहाला सर्व प्रकारचे पापड या उत्पादनाला तृतीय क्रमांक व 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजन आणि नियोजनात सहभागी असणाऱ्यामध्ये अमोल जाधव यांचा ए.जे. डांस ग्रुप, बापू चव्हाण यांचा गजर महाराष्ट्राचा ग्रुप, स्वप्नील आराख यांचा स्वर मिलाप ग्रुप, युवा शाहीर विक्रांतसिंग राजपूत तसेच धनश्री अण्णा पाटील, संदीप मोरे, नितीन दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. प्रकल्प संचालक राजेश इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव व त्यांच्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा व उमेद अभियानातील सहकाऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

 

जिल्ह्यातील उमेद अभियानंतर्गत स्थापन झालेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेले उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादनाची तसेच उत्तम रित्या घरच्या खमंग चविणे बनविलेल्या खाद्य पदार्थांचे स्टॉल महोत्सवामध्ये दि. 28 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत लावण्यात आले होते. यामध्ये 150 स्टॉलच्या माध्यमातून महिलानी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार खाद्य पदार्थ, साडी, महिलापयोगी वस्तु, हस्तकला वस्तु, मूर्ती, आरोग्य विषयक काही प्रॉडक्ट अशा इतर घरघुती वस्तु उत्कृष्टरित्या पॅकिंग आणि लेबलिंग करून महिलानी स्टॉल मध्ये विक्री करीता ठेवण्यात आलेले होते. या स्टॉलला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद देत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खवय्य प्रेमींचा उत्साह पाहता रात्री उशिरापर्यंत स्टॉल महिलांना सुरू ठेवावा लागला. महिलांना महोत्सवामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक लाभ होऊन महिलांचा आनंद व्दिगुणीत झाला. हीच उमेद अभियानाच्या दहाव्या सूत्राची पावती म्हणावी लागेल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page