मलकापुरात भैय्या जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्यांनी बदडून शिवसेना (उ.बा.ठा) ने दफन विधी उरकला

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:- शिवसेना भवनातून आलेल्या आदेशानुसार संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात आज तहसिल चौकात मलकापूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने भैया जोशी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्याने बदडून त्याचा दफनविधी कार्यक्रम उरकण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दीपक चांभारे, शहर प्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, उपशहर प्रमुख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चीम, श्याम जाधव, चाॅद चव्हाण,विश्वनाथ पुरकर,विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर ,दीपक कोथळकर, मोहम्मद रफीक अकील गौरी ,सै. तौफिक, एजाज भाई, शेख युसुफ,शेख इरफान, वासुदेव भोळे,दीपक सरोदे अकील चव्हाण, रफिक भाई, मो. रफीक साबीर खान, सत्तार शहा सह मलकापूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.