मलकापूर बुलढाणा रोडवर कार आणि दुचाकी मध्येभीषण अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही
दुचाकीस्वार गंभीर जखमी, दुचाकीचा चुरडा..

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:-गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे भरधाव वेगाने वाहन चालवणे नागरिकच स्वतःच्या जीवाशी खेळत आहे अशा घटनांमुळे आपल्या आयुष्याची राख रांगोळी नागरी स्वतः करत आहे यात काही शंका नाही( 10 मार्च रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजे) दरम्यान बुलढाणा मलकापूर रोडवर परडा फाट्याजवळ दुचाकी आणि कार मध्ये भीषण अपघात होऊन दुचाकी आणि कारचा अक्षरशः चुरडा झालेला आहे सुदैवाने कार मधील एअरबॅग उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसून जखमींना बुलढाणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व एक्सीडेंट कशामुळे झाला ज्याची विचारपूस सुरू आहे.