शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:- नांदुरा,जळगाव (जामोद) तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील ईले लाईट चे पोल वरील तारांची चोरी चे प्रमाण खूप वाढले आहे, अंदाजे दोन-तिन वर्षापासून निमगाव भागातील चार शेतकऱ्यांचे शेतातून तार चोरी जाऊन २ ते ३ वर्षे होत आहे परंतू त्यांचे शेतात तार लावण्यात आले नाही शेतातील विहिरीत पाणी उपलब्ध असतांनाही बागायती शेती करता येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला म्हणून मलकापुर कार्यकारी अभियंता आर.जि.तायडे यांच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दिपक चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात शिवसेना स्टाईलने ठिय्या आंदोलन करण्यात आले, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत विद्युत पोलवर तारा ओढल्या जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही व म.रा.वि कंपनी कार्यालयाची तोडफोड सुरू करण्याचा इशारा देताच तायडे यांनी संबंधित शेतकऱ्यांचे काम मनोज ब्राह्मणकर या ठेकेदाराला करण्याचे आदेशही दिले व संबंधित ठेकेदाराने 15 ते 20 दिवसात हे काम पुर्ण करुन देतो असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले त्या कामामध्ये नांदुरा तालुक्यातील संजय जामोदे निमगाव गट न 608,पंडीत राव जगन्नाथराव पाटील रा येरळी गट. न 145, ॲड प्रशांत बाणाईत गट. न 105,भगवान बावस्कर आमसरी गट. न 44
तसेच जळगाव जामोद तालुक्यातील गजानन तिजारे चावरा ईलोरा व पिंपरी खोद्रे येथील तार सुध्दा 8/10 दिवसात बसवण्यात येणार असल्याचे म.रा.वि.कंपनी चे आर.जि तायडे यांनी सांगितले,यावेळी उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, उपशहर प्रमुख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चीम, श्याम जाधव, चाॅद चव्हाण,विश्वनाथ पुरकर,विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर ,दीपक कोथळकर, मोहम्मद रफीक अकील गौरी ,सै. तौफिक, एजाज भाई, शेख युसुफ,शेख इरफान, वासुदेव भोळे,दीपक सरोदे अकील चव्हाण, रफिक भाई, मो. रफीक साबीर खान, सत्तार शहा सह मलकापूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.