राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची महावितरणच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राला शैक्षणिक भेट

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय बुलढाणा येथील अध्यक्ष श्री. धृपदरावजी सावळे साहेब व प्रबंधक सौ. कीर्तीताई पऱ्हाड (सावळे) , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. पी. कावरे तसेच तंत्रनिकेतन विभागाचे प्राचार्य पी. एस. राणे, अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बी. व्हि. नरवाडे तसेच सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. नितीन पायघन, इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.रामेश्वर मोळे, संगणक विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. पूनम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 मार्च 2025 रोजी सागवान येथील 33/11 के.व्ही. महावितरण उपकेंद्राला विविध अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. या दौर्यात विद्यार्थ्यांनी विद्युत वितरण प्रणाली, ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन आणि उपकेंद्रातील तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष ज्ञान घेतले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विद्युत उपकेंद्राच्या कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी ट्रान्सफॉर्मर, स्विचगियर, संरक्षण यंत्रणा आणि वीज पुरवठा व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वीजपुरवठ्याच्या सातत्य, देखभाल आणि सुरक्षितता उपायांबद्दल प्रश्न विचारले, त्यावर अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञान मिळाले असून, त्यांना औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळण्यास मदत झाली. उपस्थित विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शना बद्दल आभार मानले.
या भेटीत महावितरणचे अधिकारी श्री. गणेश राणे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या भेटीसाठी इलेक्ट्रिकल विभागाच्या प्राध्यापिका मोनाली ढोके यांच्या साह्याने या भेटीचे आयोजन करण्यात आले तसेच या भेटीसाठी प्रा. नितीन पायघन, प्रा. रामदास चोपडे, प्रा. प्रियंका रसाळ,प्रा. आकाश पोपळघट, प्रा. सपना जाधव, , प्रा.आरती दांडगे, प्रा. नयन इंगळे, श्री. विशाल शिंदे (कार्यालयीन अधीक्षक) तसेच प्रयोगशाळा सहाय्यक कैलास लडके, भुषण चितवार यांचे विशेष सहकार्य लाभले.