शिवाजी विद्यालयात माईंडफुलनेस चा संदेश:- डॉ वैशाली निकम

बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- स्थानिक श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघ आणि सखी सावित्री मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने यश दूर नाही या वर “सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो तर कर्तुत्वाजवळ थांबतो” यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉ.सौ वैशाली निकम मॅडम यांनी शिवाजी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच सर्व महिला शिक्षकांना केले
एकाग्रता वाढवण्यासाठी माईंड फुलनेसचा कसा वापर करावा याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली तसेच मनाला व शरीराला सुंदर बनवण्यासाठी किती किती वेळ द्यावा याचं मार्गदर्शन करून आपल्या मनातला विचार वाचा व त्याकडे लक्ष द्या त्यासाठी योगा व ध्यान याची गरज आहे हा संदेश दिला
सदर कार्यक्रमा ला पालक प्रतिनिधी वैशालीताई कुऱ्हे यांनी उपस्थिती लावली व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्रा. श्री कावरे सर यांनी स्वीकारले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजपूत सर यांनी केले व सूत्रसंचालन वैशाली हिंगे यांनी केले तर आभार कु. पिवतकर यांनी मानले