केळवद येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या डीबी पथकाने आवळल्या मुस्क्या
डिबी पथकाची कारवाई, 2 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त!

चिखली ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) केळवद येथील एका घरफोडीतील आरोपीला चिखली पोलीस ठाण्यातील डि बी पथकाने अवघ्या 24 तासात बेड्या ठोकून चोरलेला तब्बल 2 लाख 72 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.विजय महादू गवई असे आरोपीचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील केळवद येथील राजेंद्र बाबुराव पाटील हे 7 मार्च रोजी कुटुंबासह बाहेरगावी लाखनवाडा येथे गेले होते.दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास ते परत आली असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले.घरात प्रवेश करून पाहिले असता कपाटातील तिजोरी उघडी दिसली.या तिजोरीतील सोन्याची चैन, अंगठी असा एकूण 2,72,500 किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे समजले. दरम्यान राजेंद्र पाटील यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. ठाणेदार संग्राम पाटील यांनी डि बी पथकाला हा तपास सोपविला होता.पथकातील सफौ राजेंद्र काळे, निलेश सावळे, अजय इटावा यांनी तपास सुरू केला असता त्यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी आरोपी विजय महादू गवई याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडीची कबुली दिली असून,आरोपी कडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.