राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या सोमवार व शुक्रवारला सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मार्च महिण्यासाठी वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाचे कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.बुलडाणा विभागातील चिखली आगार येथे सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी, खामगांव आगार येथे शुक्रवार दि. 21 मार्च, मेहकर आगार येथे सोमवार दि. 24 मार्च, मलकापूर आगार येथे शुक्रवार दि. 28 मार्च, जळगांव जामोद येथे शुक्रवार दि. 4 एप्रिल व शेगांव आगार येथे सोमवार दि. 7 एप्रिल रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.