Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

सोशल मीडिया चा वापर करताना आई वडिलांनी आपल्या मुलामुलींकडे लक्ष्य देणे गरजेचे डॉ वंदना कारखेले

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जागतिक महिला दिना निमित्त उड़ान नारी शक्तीची भरारी चा कार्यगौरव सोहळा गर्दे वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रात उडान भरणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उडान नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम च्या सुरवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.

 

माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व वटवृक्षाला पाणी टाकून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण. सिनेमा अभिनेत्री ऐश्वर्या बडदे , स्वागताध्यक्षा डॉ. कृतिका हिरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक प्रिया उमाळे,स्नेहलता मानकर गायत्री काळे जयश्री शिंदे बाल कल्याण स.कांचना करवंदे मंगला सवडतकर मंडळ अधिकारी, मीना लहाने नवनीता चव्हाण, प्रज्ञा लांजेवार स्नेहलता मानकर हे प्रमुख अतिथी होत्या समाजसेविका ज्योतीताई पाखरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, क्षितिज वैशाली गजेंद्र निकम, अस्मिता ठोंबरे ऐश्वर्या बडदे यांना माँ साहेब जिजाऊ पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले तसेच.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या मध्ये समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला तसेच डॉक्टर महिलांचाही सन्मान झाला यामध्ये डॉ मनीषा राठोड, डॉ सरोज शेवाळे,डॉ केतकी माळी,डॉ छाया महाजन,डॉ रेशमा लोखंडे,डॉ मनीषा राठी,डॉ कविता सावळे,डॉ वैशाली निकम,डॉ.कृतिका हिरे कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्षा प्रास्ताविक डॉ गायत्री सावजी यांनी केले, सूत्रसंचालनाची धुरा किरण वाघमारे यांनी सांभाळली. या कार्यक्रमासाठी अँड. गौतमी कस्तुरे भाविक धनवानी मोक्षदा धनवानी प्रा ज्योती पाटील,पूजा डोंगरदिवे,राजेंद्र ज्ञानेश्वर बावणे ,गजानन कांकळ,ज्योती धंदर, शिवरणी जैस्वाल,सोनल चव्हाण,नरेश नालमवर,शुभम सुरडकर संदिप चंदन, स्वराली काकडे हर्षल वानखेडे, तुषार ठोके , तसेच पत्रकार राजेंद्रजी काळे सुनील तिजारे व टिकर बुक डेपोचे सर्वेसर्वा टीकार सर यांची उपस्थिती होती दिव्या फाउंडेशन परिवार तसेच ह्या कार्यक्रमाला अनेक महिला उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने ज्योतीअशोक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे मानले आभार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page