डोणगावात ग्रामविकास अधिकाऱ्याला मारहाण…

डोणगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :– ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांना एकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तौफिक शहा कट्टू शहा (रा. डोणगाव) याने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्याने ग्रामविकास अधिकारी तांबारे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना गावात येऊ देणार नाही, अशी धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या हल्ल्यात दीपक तांबारे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरून तौफिक शहा विरुद्ध गुन्हा दाखला करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत. तौफिक शहा याने अकारणच हा प्रकार केल्याचे तांबारेंचे म्हणणे आहे.