सामाजिक वनीकरण विभाग बुलडाण यांच्या कडून पर्यावरण पूरक रंग निर्मिती कार्यशाळा आयोजित..
पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणते रंग वापराल का.....?

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:- होळी व रंगपंचमीच्या दिवशी पर्यावरण पूरक पद्धतीच्या रंगांचा वापर करीत पाण्याची विनाकारण नासाडी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी आणि आपन पर्यावरणस्नेहीनी होळी आणि धुळवड साजरी केली असून आता रंगपंचमीही अशाच पर्यावरण पूरक विचारांचे आणि कृतींची काळजी घेऊन खेळायला हवी. … इकोफ्रेंडली रंगपंचमी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करणे चांगले असते. या संदर्भ संपूर्ण माहिती आज राष्ट्रीय हरित सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने के. के.के. अग्रवाल महिला महाविद्यालय मलकापूर येथे पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याबद्दल श्री अशोक सुपडा सुरडकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी बिट,पळसाची फुले,झेंडूची फुले यापासून रंग तयार करून दाखविले. या कार्यशाळेला गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.राजपूत सर, श्री.कोल्हे साहेब,श्री.गायकवाड साहेब, श्री.सुनील देशमुख,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.