आयुर्वेदाला विश्वस्तरावर पोहोचवण्याचं काम भारतीय युवा आयुर्वेदिक चिकित्सक करतील …केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीला वैश्विकस्तरावर पोहचवुन आयुर्वेदाचे ज्ञान संपूर्ण जगाला देण्याचं काम भविष्यत भारतीय युवा आयुर्वेद चिकित्सक करीत असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला .
आयुष मंत्रालयद्वारा संचालित राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचा 28 वा दीक्षारंभ समारंभ आज 17 मार्च ला दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आयुर्वेद ही भारताची पारंपारिक औषध उपचार पद्धती आहे या पद्धतीचा उपयोग आता अनेक देशांमध्ये केला जाऊ लागला आहे आयुर्वेद उपचार साईड इफेक्ट होत नसल्यामुळे अनेकांची पसंती आयुर्वेदिक उपचार पद्धतीला मिळत आहे भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीला विश्वस्तरावर नेण्याचं काम भारतातील युवा चिकित्सकांवर आहे हे युवा चिकित्सक भारतीय आयुर्वेदाचे ज्ञान संपूर्ण विश्वाला देण्याचे काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमादरम्यान 2024 25 सी आर ए वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आयुर्वेद क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही मंत्री महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठातील शास्त्रज्ञ संशोधक विद्यार्थी व आयुर्वेदिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते