शेतकरी कैलास नागरे यांच बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही . केद्रीयमंत्री प्रतापराप जाधव यांनी घेतली नागरे कुटुबीयाची सांत्वनपर भेट …

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं या मागणीसाठी युवा शेतकरी कैलास नागरे यांनी दिलेल बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी ग्वाही केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली …
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधीत विषारी औषध प्राशन करून आपल्या शेतामध्ये त्यांनी जीवन संपवले आज 16 मार्चला स्वगीय कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शिवणी आरमाड येथे झाला यावेळी स्वर्गीय कैलास नागरे यांचे वडील अर्जुनराव नागरे यांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांत्वनपर भेट घेतली त्यांना धीर देत दुखःत सवेदना ही व्यक्त केल्यात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की कैलासराव हे प्रयोगशिल शेतकरी होते शेतक ऱ्यांच्या हितासाठी त्यांची तळमळ होती पण त्यांनी एवढ टोकाच पाऊल उचल ही दुदैव्याची गोष्ट आहे त्याच बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही .. विदर्भ आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून करणारा वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत वेळोवेळी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून तो मंजुर करून घेतला . या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 88 हजार 554 कोटी रुपये मंजुर केले हा प्रकल्प झाल्यावर बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे ही त्यांनी सांगितले
स्वर्गीय कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला पंचकोशीतील ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते