अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे होणार…
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले जाहीर

नांदेड:- वृत्तसेवा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत संत नगरी शेगाव येथे पुढील राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली.
या बैठकीचे उद्घाटन एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकत पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, मराठी पत्रकार परिषद ही केवळ एक संघटना नसून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. पत्रकारांवरील अन्याय, अत्याचार, आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी परिषद सातत्याने संघर्ष करत आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी आणि 86 वर्षांची परंपरा असलेली चळवळ आहे. राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12,000 पत्रकार या परिषदेचे सभासद आहेत. पत्रकारांच्या न्याय आणि अधिकारांसाठी हा लढा अखंडपणे सुरू राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजीटल मिडीया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर, माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सौ. शोभाताई जयपूरकर आदी मान्यवरांनी पत्रकारितेच्या सध्याच्या परिस्थितीवर आणि भविष्यातील आव्हानांवर आपले विचार मांडले. बैठकीला कार्यकारिणीचे राज्य पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हाध्यक्ष,परिषद प्रतिनिधी, अधिस्वीकृती समिती सदस्य, डिजिटल मीडिया, महिला आघाडी सह राज्यभरातून 27 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र गित विजय जोशी यांनी सादर केले.संचलन परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष पंडागळे यांनी केले. तर बैठक यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संतोष पंडागळे, राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या नियोजनाखाली कोअर कमिटी आणि इतर सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. नांदेड जिल्हा पत्रकार संघातर्फे परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित पत्रकारांना संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि उद्दिष्टांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी एकमुखी निष्कर्ष निघाला की, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी मराठी पत्रकार परिषद अधिक ठोस भूमिका घेईल. शासनदरबारी पत्रकारांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.ङ्घङ्घपरिषदेचे अस्तित्व टिकवणे ही केवळ जबाबदारी नसून पत्रकारांसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे,ङ्घङ्घ असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. सर्व उपस्थित पत्रकारांनी परिषदेच्या संघर्षात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
शेगाव येथे होणारे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्याकरीता संपूर्ण ताकद झोकुन देवुः राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे
86 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेश कोठे घ्यायचे यावर चर्चा सुरू असतांनाच हे अधिवेश बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे व्हावे अशी आग्रही मागणी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी या बैठकीत केल्यानंतर राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमान पद बुलडाण्याला मिळाले.
सात वर्षापुर्वी शेगाव येथे झालेले राज्यस्तरीय अधिवेश यशस्वी करण्याचा अनुभव आपल्याला असल्यामुळे सदर यजमान पद आम्हाला द्यावे अशी मागणी चंद्रकांत बर्दे यांनी केल्यानंतर राज्य बैठकीत यावर एकमत करण्यात आले. आणि ऑगस्ट 2025 या महिण्यात अधिवेशन शेगाव येथे होणार असल्याची घोषणा केल्यानंतर चंद्रकांत बर्दे यांनी सदर अधिवेशन यशस्वी करण्याकरीता आपण संपुर्ण ताकद झोकुनदेवु अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा. पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.