शासकीय आयटीआय सिंदखेड राजा येथे निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- राजे लखुजीराव जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा येथील वापरून निकामी, निरुपयोगी, कालबाह्य यंत्रसामग्री, हत्यारे व अवजारे इत्यादी निर्लेखित करण्यात आलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. साहित्याची यादी आणि पाहणीची व्यवस्था संस्था कार्यालयात दि. 17 मार्चपासून कार्यालयीन वेळेत करण्यात आली आहे.
मोहोरबंद निविदा दिनांक 26 मार्च 2025 रोजी बुधवार सायंकाळी 04:00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत निविदा पेटीत जमा कराव्यात. नंतर आलेल्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत. निविदेच्या अटी व शर्ती कार्यालयात उपलब्ध आहेत. निविदा अर्जाची किंमत 100 रुपये रोख भरून निश्चित कालावधीत अर्ज प्राप्त करुन घ्यावे. साहित्याची संख्या कमी-अधिक करण्याचे अथवा निविदा नाकारण्याचे पूर्ण अधिकार प्राचार्य, राजे लखुजीराव जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
या निविदा प्रक्रियेत इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य जि.एस. भावले यांनी केले आहे.