माणुसकीतून चिवचिवाट जागविणारा राहूल!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) हल्ली चिमण्यांचा चिवचिवाट दुर्लभ झाला असून चिमण्यांची घटती संख्या चिंतेची बाब ठरत आहे.अशात सुंदरखेड परिसरात राहणारे राहुल चव्हाण या पक्षीप्रेमीने आपल्या घरात होणाऱ्या चिमण्यांसाठी घरटे बांधून त्यांना दाना पाण्याची व्यवस्था करीत संवेदनशीलता जपली आहे.
सध्याच्या काळात चिऊ ये ..दाना खा.. पाणी पी भूर्र उडुन जा … हे गाणे पण आता बालकांना शांत बसवण्यासाठी सांगितले जात नाही. काळ बदलत चालला लहान मुलांच्या हातात आता पालक मोबाईल देतात. अशा काळात 20 मार्च जागतिक चिमणी दिवस साजरा करत असतांना चिमण्याच दिसेनाशा झाल्या. अशा वेळी बुलढाण्यातील सुंदरखेड परिसरात राहणारे राहुल चव्हाण यांच्या घरी मात्र चिमण्यांचा मुक्त संचार असतो. त्यांनी त्यांच्या घरातील व्हरांड्यात सज्जावर चिमण्यांना घरटे करण्याची व्यवस्था करून दिली आहे.ते रोज चिमण्यांना दाना पाणी देतात. जवळपास 12 ते 13 चिमण्यांची कुटुंब त्यांच्या घरी राहतात. त्यांची सकाळच चिमण्य़ांच्या चिवचिवाटाने होते. छोटा प्रयत्न असला तरी चिमणी संवर्धनासाठी तो निश्चितच अभिनंदनीय आहे.