शेगाव येथील प्रकल्प ग्रस्त नागरिकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण….

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच ठरवून दिलेल्या जागेवर शेगाव येथील प्रकल्पग्रस्त नागरिक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
17 मार्च रोजी या उपोषणाची सुरुवात झाली मात्र आज पाचवा दिवस निघाला तरी यावर कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचा उपोषण कर्ते यांनी सांगितले आहे.
लहुजी नगर मुरारका हायस्कूल जवळील अतिक्रमण कारवाई मध्ये प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्या राहत्या घराचे व सामनाची नाजूक करून त्यांचे संसार उघड्यावर आणण्यात आले. या कारवाईत सामील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होऊन प्रकल्पग्रस्त नागरिकांना पुनर्वसन होऊन त्यांचा सर्वे करून घरकुल मध्ये समाविष्ट करण्यात यावे, शेगाव ता क्रीडा प्रकल्पग्रस्त नागरिक यांचे तत्काळ सध्या पुनर्वसन करण्यात यावी, परभणी येथील मातंग समाजाची दहा वर्षाच्या बालेकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, उदगीर जिल्हा लातूर येथील मातंग समाजाच्या कामगाराला मारहाणीत मृत्यू प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, निरोड तालुका संग्रामपूर येथील मातंग समाजातील अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या आरोपी अजून फराळ आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी, आतापर्यंत मातंग समाजावर झालेल्या प्रकरणात मातंग समाजाला न्याय मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.