चिखली तालुक्यातील मानमोड गावातील घर क्रमांक 43 मधील संपादक क्षेत्राची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण….

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- चिखली तालुका येथील मानमोड या गावातील घर क्रमांक 43 मधील संपादक क्षेत्राची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सतीश पुंजाजी दांडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर म्हणजेच ठरवून दिलेल्या जागेवर आमरण उपोषण सुरू केले आहे.
17 मार्च रोजी या उपोषणाची सुरुवात करण्यात आली. आज पाचवा दिवस निघाला मात्र अद्याप कुठलीही कारवाई नाही.
पुंजाजी दांडगे यांचे घर क्रमांक 43 चे पेनटाकळीत प्रकल्पांतर्गत संपादित केले होते. परंतु संपादित करत असताना नजरचुकीने आमचे वरील नमूद घराचे एकूण क्षेत्रफळ 11.52 असे नमूद केले आहे परंतु आमचे घराचे खरे क्षेत्रफळ 29.7398 चौ. मी. असे आहे तरी सदर क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी उपविभागीय अधिकारी व इतर संबंधित कार्यालयात अर्ज करून सुद्धा अद्याप पर्यंत सदर दुरुस्ती करण्यात आलेली नाही. घराच्या क्षेत्रफळाच्या दुरुस्तीसाठी कार्यालय मेकर येथे वारंवार गेले असता त्यांनी आज करतो उद्या करतो व असे उडवडीचे उत्तर दिले आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही याउलट त्यांनी जे आहे त्यात खुश रहा नाहीतर त्यातूनही कमी करतो अशी धमकी सुद्धा यावेळी देण्यात आली आहे असे तक्रार करता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
घराच्या क्षेत्रफळाची दुरुस्ती करण्यात यावी ही मागणी धरून आमरण उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही हे उपोषण असेच सुरू राहणार असे तक्रार करते यांनी सांगितले आहे.