बुलढाणा जिल्ह्याचे पुत्र ॲड. श्रीकांत जायभाये महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित….

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र ॲड. श्रीकांत गजानन जायभाये यांना महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2025 मिळाला आहे. 21 मार्च 2025 ला नाशिक येथे सोमा वाईन व्हिलेज रिसॉर्ट येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ॲड. श्रीकांत गजानन जायभाये यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुद्धा उंच पातळीवर गेले आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राला हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक गर्वाची गोष्ट आहे.
नाशिक येथे सोमा वाईन व्हिलेज रिसॉर्ट या ठिकाणी त्यांना हा मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा मिळालेला सन्मान त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहणार आहे या सन्मानाने त्यांच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित झाला आहे. सन्मान मिळाला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त केले. त्यांच्या या यशाच्या पाठीशी आई-वडील बहिण भाऊ तसेच भाऊजी व सर्व वडीलधारी मंडळी यांना या यशाचे श्रेय दिले आहे.
बुलढाणा शहरात ॲड. श्रीकांत गजानन जायभाये यांचे अत्यंत कमी काळात लोकप्रिय झालेले आराध्या लॉन्स म्हणून प्रसिद्ध आहे. राजेशाही थाटामध्ये जर लग्न करायचा असेल तर बुलढाणा शहरात एकमेव पर्याय म्हणून आराध्या लॉन्स हे सध्या लोकप्रिय ठरलेली आहे.