केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आला संशोधन कार्यासाठी अनुदान मिळालेल्या प्रा. डॉ. गजानन घायाळ यांचा सत्कार …

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दिल्ली येथील अनुसंधान परिषदेतर्फे उत्कृष्ट संशोधनकार्य केल्या बद्दल डॉ प्रा गजानन घायाळ यांना 16 लक्ष रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे त्यांनी आयुर्वेदीक महाविद्यालयातील ग्रंथालयात ई संसाधनाचा वापर या विषयातील शोध प्रकल्प भारतीय सामाजिक विज्ञान व अनुसंधान परिषद नवी दिल्ली याच्याकडे सादर केला होता हा प्रकल्प उत्कृष्ट झाल्यामुळे त्यांना अनुसंधान परिषदेतर्फे 16 लाख अनुदान मंजूर झाले आहे त्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रा डॉ घायाळ यांचे कौतूक केले आहे तर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा येथील कार्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. गजानन घायाळ यांचा आज 23, मार्च रोजी सत्कार करण्यात आला यावेळी प्रा डॉ सचिन जाधव केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ गोपाल डिके प्रा युवराज वाघ अभिजीत चव्हाण संदीप तांगडे सचिन ठाकूर निखिल बावस्कर उपस्थित होते प्रा. डॉ. गजानन घायाळ यांना महाराष्ट्रातील
प्रा. डॉ. घायाळ हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे संशोधक मार्गदर्शक असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत आहेत. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना सारथी अन् बार्टी या संस्थेकडून दहा लक्ष रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. प्रा. डॉ. गजानन घायाळ हे राज्यातील आणि बाह्य राज्यात अनेक विद्यापीठाचे पीचडी.चे बाह्य परिक्षक देखिल आहेत. यासोबतच, ते अमरावती विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत आहेत. विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांचे ते पदाधिकारी आहेत. सोनुना ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे ते दहा वर्षांपासून अध्यक्ष आहेत.