बुलडाणा जिल्हयाला 3 शववाहीका मंजुर … !
ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याच्या दृष्टीने होणार शव वाहीकेची मदत ...!! केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला होता पाठपुरावा ...!

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हा अंतीमसंस्कारासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्याला 3 शववाहिका मिळल्या आहे . या संदर्भात केंद्रीय आयुष , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता
व्यक्ती आजारी पडला किंवा काही व्याधी निर्माण झाली तर त्याला सर्वसामान्यपणे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वैद्यकीय उपचार करिता दाखल केले जाते अनेक वेळा उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू होतो अशावेळी त्याचा मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी खाजगी वाहणाची मदत घ्यावी लागले .. करण रुग्णवाहीका ही आत्यवश्यक सेवासाठी वापल्या जात असल्याने ती मिळत नाही त्यामुळे शासकीय रुग्णालयात मृत्यु झालेल्या व्यक्तीला ग्रामीण भागात त्याच्या घरापर्यंत अंत्यविधीसाठी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर शववाहिका असावी या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार राज्यामध्ये 132 शववाहीका मंजूर करण्यात आल्या आहेत त्यातील 3 शववाहीका बुलढाणा जिल्ह्याला मिळणार आहे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली घ्या शव वाहीका राहणार आहे त्यातील एक शव वाहीका बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राहणार आहे त्या शव वाहिकेचा उपयोग ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे …