अरुणाचल प्रदेशातील अतिदुर्गम टाटो गावाला भेट देऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आरोग्यसह केंद्र सरकारच्या योजनांचा घेतला आढावा…

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-अतिदुर्गम भागातही आरोग्य सेवा पोहचुन वैद्यकिय सेवेला बळकटी देण्याच काम केंद्र सरकारच्या माध्यमातुन केल्या जात आहे. अशी ग्वाही केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अरुणाचल प्रदेशातील टाटो येथिल ग्रामस्थांशी संवाद साधतांना दिली. भारत चीन सीमारेषेजवळ असलेल्या टाटो या अतिदुर्गम वस्तीला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील प्रतापरावजी जाधव हे दुसरे मंत्री आहेत.
अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ दरीखोऱ्यात वसलेल्या शिओमी जिल्हयातील टाटो येथिल नागरीकांना मिळत असलेल्या मुलभूत सेवेचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान कार्यालयाच्या सुचनेनुसार केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी नुकतीच टाटो या गावाला भेट दिली. घनदाट अरण्य, डोंगरदऱ्यांनी वसलेल्या टाटो गावाला जाण्यासाठी हेलिक्रॉप्टरचा पर्याय निवडण्यात आला होता. परंतु उन्हाळयातही तेथे पाऊस पडत असल्याने अखेर आठ तास गाडीने प्रवास करुन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव टाटो या गावी पोहचले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन तेथिल आरोग्य सुविधेची माहीती वैद्यकिय कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन घेतली. त्यानंतर प्रशासिकिय अधिकाऱ्यांसोबत बेठक घेऊन केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. तेथिल शाळांनाही भेट दिली. ग्रामस्थासोबत संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारचे ध्येय समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हे आहे. आरोग्य सेवेला बळकटी देण्याचे काम केंद्र सरकारच्या वतीने केल्या जात आहे. दर्जेदार वैद्यकिय सुविधा देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचली किंवा नाही यांचा आढावा घेण्यासाठी आपण येथे आल्याचेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना सांगितले.प्रत्येक गावातील ग्रामस्थांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. टाटो हे गाव भारत चीन सीमारेषेजवळ असुन तेथुन चीन फक्त 30 कि.मी.अंतरावर आहे. या गावाचा यशसवी दौरा करुन गावातील कृषी , आरोग्य , शिक्षण , रोजगार , व इतर केद सरकाराच्या योजने संदर्भांतील माहीतीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयामार्फत सुपुर्द करण्यात आला आहे.