रायपूर येथे भव्य पालक मेळावा उत्साहात साजरा

रायपूर 🙁 आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) श्री शिवाजी विद्यालय रायपुर ता. जि. बुलढाणा येथे भव्य पालक मेळावा संपन्न. स्व. मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सागवन चे विद्यमाने श्री शिवाजी विद्यालय रायपुर ता. जि. बुलढाणा येथे रायपूर परिसरातील सर्व नागरिक व पालक यांच्या सहभागाने भव्य पालक मेळावा आज दि. 25 मार्च2025 रोज मंगळवार ला संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई एकनाथ कोरडे पाटील ह्या होत्या. तसेच संस्थेचे सचिव श्री एकनाथराव कोरडे पाटील साहेब व संस्थेचे सर्व पदाधिकारी हजर होते. संस्थेचे सचिव श्री एकनाथ कोरडे साहेबांनी आपल्या भाषणातून सांगितले की, येणाऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना सामाजिक व शारीरिक विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी आरोग्य तपासणी व शासन धोरणानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध पुरवण्यात येतील. अद्यावत क्लासरूम ई. लर्निंग, स्मार्ट टीव्ही, टॅब, प्रोजेक्टर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारणाबाबत पालकांची बैठक व्यवस्था करण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, नाविन्यपूर्ण भव्य इमारत निर्माण करण्यात येतील, विद्यार्थ्यांसाठी आर ओ शुद्ध पेयजलची व्यवस्था राहील. वर्ग पाच ते दहा मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप संस्था करेल. विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येतील. विद्यालयांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांची आयोजन व वेगवेगळ्या बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासाठी स्वतंत्र शिक्षणाची मोफत संधी देण्यात येतील. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडवण्यासाठी संस्था कार्य करत राहील. सचिव साहेबांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करून भाषण संपुष्टात आणले. मेळाव्यासाठी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री दुर्गेश राजपूत साहेब तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री बालाप्रसाद जयस्वाल, डॉक्टर श्री किसन बाहेती, श्री सुनील देशमाने, तंटामुक्ती अध्यक्ष श्री मधुकर साहेब, श्री सूर्याजी शिरसाट, माजी सरपंच श्री अभिमान घोलप, श्री दयाराम म्हणते, श्री विलास अहिर, श्री नंदू देशमुख, श्री हिम्मतराव जाधव, श्री फारुक शेठ सौदागर,श्री गजानन वतपाव, श्री अभिमन्यू तायडे, श्री सुरेश जाधव, श्री शमी सौदागर व इतर रायपूर व रायपूर परिसरातील नागरिक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जी. एन. जाधव सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. पी. नपते सर यांनी केले. शाळेची मुख्याध्यापक श्री देशमाने सर, अकाल सर, पी. बी. जाधव सर शिपाई मुरडकर व कुंजरगे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री व्ही व्ही सपकाळ सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये पालकांचे खूप आनंदाचे वातावरण दिसून आले.