स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…
दारूबंदी 70, जुगार 58 तर आयपीएल सट्टा ची एक केस! 22 लाख 85 हजार 502 रुपयांचा मध्यमाल जप्त...

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) एसपी विश्व पानसरे यांच्या आदेशाने अवैध धंद्याचे उच्चाटन करण्याचा एलसीबी पोलिसांनी सपाटा लावला आहे. दिनांक 27 मार्चला दारूबंदी 70, जुगार 58 तर आयपीएल सट्टा ची एक केस करून आरोपी ताब्यात घेण्यात आले.याकारवाईत 22,85,502 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
27 मार्च रोजी डोणगाव पोलीस हद्दीत अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.यामध्ये मझर खाँ अफसर खाँ पठाण रा. साखरखेर्डा ता.सिंदखेडराजा आणि सय्यद आरिफ सय्यद हसन रा. अमडापूर ता.चिखली या दोघांवर वेग वेगळी कारवाई करत वाहन व गुटखासह एकुण 21,90,832 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच काल 26 मार्च रोजी आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणी अमडापूर पो.स्टे. हद्दीत सलमान खान सरदार खान रा.हबीब नगर अमडापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 12,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.25 ते 26 मार्च दरम्यानच्या कारवाईत जुगाराच्या 54 व दारूबंदीच्या 70 केसेस केल्या. यामध्ये जुगारातील 20,490 रुपयांचा तर दारूबंदीच्या कारवाईत 62,080रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.